Wednesday, January 6, 2010

अवयव विकणे आहे.....(स्वलिखित कविता)



अवयव विकणे आहे.....

शेतकर्‍यांची गर्दी दिसली

सहज विचारले काय दुखणे आहे?
एक बळीराजा म्हणाला काही नाही
कर्जफेड करण्यासाठी अवयव विकणे आहे

अहो काय सांगू तुम्हाला
मायबाप सरकार दुर्लक्ष करते
आम्ही राबतो दिवसरात्र
पण लक्ष्मी मंत्र्यांकडे पाणी भारते

मंत्र्यांच्या सुबत्तेवर.
खरच आमची काही हरकत नाही

पण आमच्याच मतांवर निवडून येवून
ते आमच्याकडे फिरकत नाही

कालच पुन्हा टीव्हीवर पाहिले
ह्यांनी पुन्हा विधानसभेत गोंधळ घातला
समस्या सोडवण्याचे आश्वासन देवून मत घेतले
पण समस्या वाढवण्यावरच ह्यांचा कल बेतला

अहो कर्जाचा डोंगर वाढतोय
मात्र शेतमालाला भाव नाही
काहींनी कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली
आता त्यांना गाव नाही

मी जर जमीन विकली
तर पुढची पिढी जाब विचारेल
अवयव विकला तर चिंता नाही
फार-तर दोन वर्ष लवकर मरेल

पर्याय नसल्यामुळे किडनी विकतोय
नशिबापुढे नाही चालत कुणाचे काय
तुमच्यासारखे सुशिक्षित नेतृत्व मिळो
म्हणून धरतो विठ्ठलाचे पाय

अहो किमान तुम्हीतरी आम्हाला
आपुलकीने विचारले प्रशांतभाऊ
एकदातरी नाकाम सरकारविरोधात आमच्या वतीने निवडणुक लढवा
आमचे मत ह्यांच्या आमिषाला बळी न पडता तुम्हालाच देवू

- प्रशांत गंगावणे .
(एम.टेक.,पीएच. डी.-स्नातक) .
prashant.gangawane@gmail.com


No comments: